मारुती सुझुकीची वॅगन आर ही कार शहरी आणि ग्रामीण लोकांमध्ये लोकप्रिय झालेली कार आहे.
वॅगन आर ही लोकांमध्ये प्रचलित झाल्याने या कारला लोक वॅगनार असे म्हणतात.
परंतू, अनेक जण वॅगनार हा चुकीचा उच्चार करतात.
भारतात va-guhn-aar असा त्याचा उच्चार होतो. वॅ-गन-आर असा या वॅगन आरचा उच्चार बरोबर आहे.
वॅगन आर ही कार भारतात १९९९ पासून आहे, तिला आता थोडे टॅक्सी, कॅब कार म्हणून बदनाम केले जात आहे.
परंतू वॅगन आरच्या नावात एक अर्थ दडलेला आहे. वॅगन आर मधील "आर" म्हणजे रिक्रिएशन.
आतील जागेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी वॅगन आर "उंच वॅगन" किंवा "टॉल बॉय" म्हणून तिची ओळख आहे.