फॉर्च्यूनर कार बुलेटप्रूफ करण्यासाठी किती खर्च येतो?

अनेक राजकीय नेते, कलाकार मंडळी वा मान्यवरांकडे बुलेटप्रूफ कार पाहायला मिळते. 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकताच भारत दौरा केला. त्यांच्या या भारतभेटीची जगभरात चर्चा झाली.

अत्यंत कडेकोट सुरक्षा असलेल्या जागतिक नेत्यांपैकी एक म्हणून पुतिन यांची ओळख आहे. म्हणूनच, ज्यावेळी ते भारतात आले त्यावेळी त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था आणि बुलेटप्रूफ कार याचीही चर्चा झाली.

अनेक राजकीय नेते, कलाकार मंडळी वा मान्यवरांकडे बुलेटप्रूफ कार पाहायला मिळते. मात्र, ही बुलेटप्रूफ कार करायला किती खर्च येतो माहितीये का?

स्टँडर्ड आर्मिरिंगसाठी टोयोटा फॉर्च्यूनर बुलेटप्रूफ करण्यासाठी साधारणपणे २५ ते ४५ लाख रुपये इतका खर्च येतो. मात्र, हा खर्च अधिकही येऊ शकतो.

जर तुम्हाला हाय लेव्हल बॅलिस्टिक सुरक्षा हवी असेल जी इंटरनॅशनल Vr7 किंवा Vr9 च्या दर्जाची असेल तर त्यासाठी तुम्हाला ६० लाख ते १ कोटीही मोजावे लागू शकतात. 

बुलेटप्रूफ गाडीच्या काचा या बॅलिस्टिक ग्लासपासून केल्या जातात. ज्यामुळे गोळी कितीही वेगाने आली तरीदेखील ती काच तोडू शकत नाही.

गाडी बुलेटप्रूफ करण्यासाठी त्याच्या दरवाज्यापासून ते प्रत्येक कोपऱ्यापर्यंत बॅलेस्टीक स्टील बसवलं जातं. किंवा एडव्हान्स कंपोजिट आर्मर बसवला जातो. ज्यामुळे गोळ्यांचा परिणाम कारवर होत नाही.

धकधक करने लगा...

Click Here