व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे महिलांमध्ये दिसतात लक्षणे 

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. जे आपली हाडे, स्नायू आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 

व्हिटॅमिन डी ची कमतरता महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. 

व्हिटॅमिन डी ची कमतरता केवळ शारीरिक आरोग्यावर परिणाम करत नाही तर आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करते. 

या कमरतेमुळे महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल पाहायला मिळतात. 

हाडे- सांधेदुखी सारख्या समस्यांना व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सामोरे जावे लागते. यात कंबर, गुडघे आणि पाठदुखीची समस्या असू शकते. 

थकवा, अशक्तपणा, आळस येणे हे देखील व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे लक्षण आहे. 

या कमतरतेमुळे केसांची मुळे कमकुवत होणे, केसगळती होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. 

व्हिटॅमिन डी चा संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी येतो. यामुळे मूड स्विंग, चिडचिडेपणा आणि नैराश्यासारख्या मानसिक समस्या देखील उद्भवतात. 

यामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होते. वारंवार सर्दी, खोकला देखील होऊ शकतो. 

Click Here