कोहलीला तोड नाय; इथं पाहा कसोटीतील ५ 'विराट' विक्रम
किंग कोहलीनं आपल्या कसोटी कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात त्याने बीसीसीआयला कळवल्याचे वृत्त समोर आले आहे.
विराट कोहली हा क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय अन् यशस्वी क्रिकेटर आहे.
इथं एक नजर टाकुयात त्याच्या कसोटी कारकिर्दीतील खास रेकॉर्ड्सवर
विराट कोहली हा कसोटीतील टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ६८ पैकी ४० सामने जिंकले आहेत.
त्याच्या नेतृत्वाखालील २०१८ ते २०१९ या कलावाधीत ऑस्ट्रेलियासह इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाने ऐतिहिसिक विजय नोंदवले आहेत.
भारताकडून कसोटीत सर्वाधिक द्विशतकाचा विक्रम विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने ७ द्विशतके झळकावली आहेत. नाबाद २५४ धावा ही कसोटीतील सर्वोच्च कामगिरी राहिली आहे.
तो सलग चार कसोटी मालिकांमध्ये चार द्विशतके झळकवणारा एकमेव फलंदाज आहे. यासह त्याने डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांचा संयुक्त विक्रम मोडित काढला होता.
भारतीय कर्णधाराच्या रुपात कसोटीत सर्वाधिक ५,८६४ धावा आणि सर्वाधिक २० शतकांसह तो महेंद्रसिंह धोनी आणि सुनील गावसकर यांच्या खूप पुढे आहे.