कोहलीच्या मनात या ३ गोलंदाजांची धास्ती!

किंग कोहलीनं स्वत: केलाय मोठा खुलासा, जाणून घ्या सविस्तर 

विराट कोहली हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्यासमोर गोलंदाजी करणं कोणत्याही गोलंदाजासाठी एक मोठं चॅलेंजच असते.

क्रिकेटच्या मैदानात आपला दबदबा दाखवून देणाऱ्या किंग कोहलीला काही गोलंदाजांनी दमवल्याचेही पाहायला मिळाले आहे. 

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अधिराज्य गाजवणाऱ्या कोहलीनं कोणत्या गोलंदाजाचा सामना करणं कठीण वाटते, त्यासंदर्भातील मोठा खुलासा केला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये जेम्स अँडरसनचा सामना करणं अधिक आव्हानात्मक होते, असे विराट कोहली म्हणाला आहे.

अँडरसन याने कसोटीत ७१० चेंडूत ३०५ धावा खर्च करत विराट कोहलीला ७ वेळा  बाद केल्याचा रेकॉर्ड आहे.

IPL मध्ये १२९ चेंडूत १३६ धावा खर्च करताना सुनील नरेन याने ४ वेळा कोहलीची विकेट घेतलीये. त्याचा सामना करणंही कठीण असल्याचे विराटनं मान्य केले आहे.

वनडेत आदिल राशीदचा सामना करणं कोहलीला अवघड वाटते. इंग्लंडच्या गोलंदाजाने १३० चेंडूत ११२ धावा खर्च करताना ५ वेळा त्याची विकेट घेतलीये.