कोहलीला हे जमलं नसतं असं नाही, पण...
क्रिकेट जगतात आपली खास छाप सोडणाऱ्या विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये.
१४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत अनेक विक्रमाला गवसणी घालणारा कोहली सहज आवाक्यात असणाऱ्या काही मोठया विक्रमापासून दूर राहिला.
कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठण्यापासून कोहली फक्त ७७० धावांनी मागे राहिला.
बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा विक्रमी डाव साधण्याची संधीही त्याला होती. पण हा डावही हुकला.
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनी बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत प्रत्येकी ९-९ शतके झळकावली आहेत।
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा डाव साधणंही त्याच्यासाठी मुश्किल होऊ शकते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली २६१७ धावांसह दुसऱ्या स्थानावरच राहिला.
आणखी एक कसोटी मालिका खेळून त्याला भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (२७१६ धावा) ला ओव्हरटेक करता आले असते.
Your Page!