विराट कोहलीने शेअर केलेल्या फोटोवर लाईक्स अन् कमेंट्सची 'बरसात'
विराट कोहली हा फिल्डसह फिल्डबाहेरील गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत राहणारा चेहरा आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडीही सुपरहिट आहे.
अनुष्काच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून अनेकदा कोहलीची झलक पाहायला मिळते. पण आपल्या इन्स्टा अकाउंटवरून तो फारच कमी वेळा अनुष्काचे फोटो शेअर करतो.
त्यामुळेच विराटनं अनुष्कासोबत शेअर केलेली ही पोस्ट लोकप्रिय ठरली. पोस्ट पडल्यावर ११ व्या मिनिटांत या पोस्टनं १ मिलियनचा आकडा पार केला.
याआधी विराट कोहलीनं टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर ३ जुलै २०२४ रोजी अनुष्कासोबत खास फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळाले होते.
मागच्या बर्थडेच्या दिवशी विराट कोहलीनं अनुष्काचा हा खास फोटो शेअर केला होता. वर्षात फक्त ३ वेळा त्याच्या पोस्टमध्ये अनुष्काची झलक दिसलीये.
विराटच्या तुलनेत अनुष्का सोशल मीडियावर अधिक सक्रिय असून बहुतांश वेळा तिच विराट कोहलीचे खास फोटो शेअर करताना दिसते.