जगातील असा देश जेथे तुरुंगही नाही अन् कैदीही!

तुम्हाला माहितीये का या देशाविषयी?

कल्पना करा एक असा देश जिथे एकही गुन्हेगार नाही किंवा तुरुंग हा प्रकारही नाही. खरंच असा एक तरी देश आहे का जिथे गुन्हाच घडत नाही? हो. पण, हे खरं आहे. खरंच असा एक देश आहे.

वेटिकन सिटी या देशात तुरुंग नसून एकही गुन्हेगार नाहीये. मुळात हा देश प्रचंड लहान आहे. परंतु, येथील कायदे तितकेच कठोर आहेत. त्यामुळे इथे गुन्हा घडतच नाही.

वेटिकन सिटी हा देश इतका लहान आहे की संपूर्ण देशात तुम्ही पायी प्रवास करु शकता. या देशात फक्त ८०० ते ९०० लोक राहतात.

या देशात तुरुंग नसून त्याऐवजी प्री-ट्रायल डिटेंशन सेल आहेत. त्यामुळे जर या देशात एखाद्या व्यक्तीने गुन्हा करायचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावर संशय असेल तर त्याला इटलीच्या तुरुंगात पाठवलं जातं.

वेटिकन सिटीची लोकसंख्या कमी असल्यामुळे इथे फारसे गुन्हे घडत नाहीत. तसंच येथील लोक प्रचंड धार्मिक आणि शिस्तप्रिय आहेत. त्यामुळेदेखील इथे गुन्हा घडत नाही.

वेटिकन सिटीमध्ये सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. इथे ठिकठिकाणी स्वित्झर्लंड गार्ड आणि अन्य सुरक्षारक्षक तैनात असतात.

फॉर्च्यूनर कार बुलेटफ्रूफ करण्यासाठी किती खर्च येतो?

Click Here