भाज्या, आमटी आणि उसळीसाठी लागणारा ओला मसाला एकदाच करून कसा स्टोअर करायचा याच्या खास टिप्स.
ओला मसाला किंवा वाटण एकदाच जास्त प्रमाणात तयार करून योग्य पद्धतीने स्टोअर केले, तर रोजच्या स्वयंपाकात वेळ, मेहनत आणि गॅस तिन्हींची बचत होऊ शकते.
मसाला तयार करण्यासाठी नेहमी ताजे पदार्थ वापरा, जुनेच पदार्थ वापरल्यास मसाला लगेच खराब होतो.
वाटण वाटताना पाणी घालू नका. गरज पडल्यास अर्धा चमचा तेल घाला. पाण्यामुळे मसाला लवकर खराब होतो आणि त्याला वास येऊ लागतो.
मसाला वाटल्यानंतर तो थोड्या तेलात परतून घ्या, मसाल्यातील पाण्याचा अंश निघून गेला की तो जास्त काळ टिकतो.
मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच काचेच्या किंवा स्टीलच्या एअरटाईट डब्यात भरा. चमचा वापरताना तो नेहमी कोरडा असावा याची काळजी घ्या.
मसाला स्टोअर करताना वरुन थोडं तेल घाला, यामुळे हवा आत जाणार नाही आणि तो खूप दिवस चांगला टिकून राहील.
मसाला महिनाभर टिकवायचा असेल, तर तो 'आइस ट्रे'मध्ये भरून त्याचे क्युब्स तयार करा, गरज पडेल तसा एक क्यूब काढून वापरा.
वाटण स्टोअर करताना त्यात थोडे जास्त मीठ आणि चिमूटभर हळद टाका. मीठ हे 'नॅचरल प्रिजर्व्हेटिव्ह' म्हणून काम करते आणि मसाल्याचा फ्रेशनेस टिकवते.
तयार वाटण फ्रीजमध्ये, ५ ते ७ दिवस टिकते, तर फ्रीजरमध्ये १५ ते २० दिवस सहज टिकते.