पेस्टल शेड्सपासून ते डार्क फॉरेस्ट ग्रीनपर्यंत असे अनेक रंग आहेत जे तुमच्या पार्टनरला नक्कीच इम्प्रेस करतील.
या व्हॅलेंटाईन डे ला 'क्लासी', 'सोबर' आणि तरीही 'रोमँटिक' दिसायचे असेल, तर लाल रंगाचा मोह सोडा.
डेट नाईटसाठी किंवा आऊटिंगसाठी कोणते कलर कॉम्बिनेशन सुपरहिट ठरतील, ते पाहूयात.
पिंक हा प्रेमाचा आणि रोमँटिक फील देणारा रंग आहे. पिंक टॉप किंवा ड्रेससोबत व्हाईट पँट, स्कर्ट किंवा दुपट्टा परफेक्ट आणि फ्रेश लूक देतो.
सध्या 'लॅव्हेंडर' रंग खूप ट्रेंडमध्ये आहे. संध्याकाळच्या डिनर डेटसाठी लॅव्हेंडर आउटफिटसोबत सिल्व्हर ज्वेलरी खूप क्लासी वाटते.
वाइन रंग रोमँटिक आणि रॉयल फील देतो. क्रीम किंवा ऑफ-व्हाईट रंगासोबत हा कॉम्बिनेशन डिनर डेटसाठी परफेक्ट आहे.
पिच रंग नाजूक आणि आकर्षक असतो. गोल्डन अॅक्सेसरीज किंवा दुपट्ट्यासोबत हा कॉम्बिनेशन खूपच ग्रेसफुल दिसतो.
पार्टी लूकसाठी शॅम्पेन गोल्ड टॉप किंवा ड्रेस आणि ब्लॅक ट्राउझर्स कधीही फेल जात नाहीत. हे कॉम्बिनेशन अतिशय लक्झरियस दिसते.
एक रॉयल आणि मॅच्युअर लूक हवा असेल, तर डार्क ग्रीन आणि बेज रंगाचे कॉम्बिनेशन निवडा. हे रात्रीच्या डिनर डेटसाठी परफेक्ट आहे.