या घरगुती खेळांमध्ये मुलांना ठेवा बिझी 

२ ते ६ वयाेगटातील मुलांमध्ये खूप एनर्जी असते. पावसाळ्यात मुलांना बागेत, बाहेर फिरायला नेता येत नाही. अशावेळी या गाेष्टी करून मुलांना ठेवा बिझी

लहान मुलांची एनर्जी याेग्य पद्धतीने वापरली न गेल्यास ते दंगा, मस्ती करतात. कधी कधी चिडचिड, राग - राग, रडारड करतात. 

लहान मुलांना एका जागी बसून गाेष्टी करण्याचा जास्त पेशन्स नसताे, त्यांना शारीरिक हालचाली असणारे खेळ खेळायला द्यायला हवेत. 

मुलांसाठी फरशीवर ठराविक अंतरावर बटाटे, कांदे, बाॅल किंवा साॅफ्ट टाॅईज मांडून ठेवायची. एकावेळी एका प्रकारच्या वस्तू त्यांना गाेळा करायला सांगायच्या.

बेडक्यासारख्या उड्या मारत जाऊन बाॅल गाेळा करून आणायला सांगायचे. सगळे बाॅल पुन्हा दुसऱ्या बाजूला धावत नेऊन ठेवायला सांगायचे.

एक रिंग मध्ये ठेवून, तळ्यात म्हटल्यावर रिंगच्या आत उडी मारायची मळ्यात म्हटल्यावर रिंगच्या बाहेर उडी मारायची, असा खेळ खूळ शकता. 

मुलांना चवड्यावर चालत ५ फेऱ्या मारायला सांगायच्या. यामध्ये मुलं बॅलन्सिंग शिकतात. मुलांच्या पायाचे मसल्स मजबूत हाेण्यास मदत हाेते. 

एका रेषेत पाण्याचे पेले किंवा वाट्या मांडून ठेवाव्यात. मुलांना त्याच्यावरून उड्या मारत जायला सांगावे. 

कागदी कप मांडून ठेवावेत. मुलांना बेअर वाॅक करत जाऊन सगळे कप गाेळा करून आणण्यास सांगावेत.   

अशा पद्धतीचे खेळ घेतल्यास मुलांची एनर्जी याेग्य पद्धतीने वापरली जाईल, आणि मुलंही हे खेळ एन्जाॅय करतील, आणि बिझी राहतील. 

Click Here