या 'ट्रिक्स'ने जुना माेबाईलही चालेल फास्ट!

स्मार्टफोन आता स्लाे झाला आहे. टेन्शन घेऊ नका. काही ट्रिक्स तुम्ही वापरल्या तर तुमचा जुना माेबाईल फास्ट चालेल.

माेबाईल जस जसा जुना व्हायला लागताे, तसा हँग व्हायला लागताे. महत्त्वाचा काॅल, मेसेज करताना हँग हाेताे. 

माेबाईलमध्ये काही प्राॅब्लेम असेल तर या ट्रिक्स वापरून तुमचा माेबाईल नीट चालू राहू शकताे. 

नवीन माेबाईल घेण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत. माेबाईल पुन्हा एकदा नीट चालू हाेईल. 

माेबाईल हँग हाेऊ नये म्हणून माेबाईल स्टाेरेज फूल हाेणार नाही, याची खबरदारी घ्या. माेबाईल स्टाेरेज रिकाम ठेवा. 

माेबाईल सतत हँग हाेत असेल, तर माेबाईलचे साॅफ्टवेअर अपडेट करू शकता. यामुळे हँग हाेण्याचे प्रमाण कमी हाेईल. 

माेबाईल फॅक्टरी रिसेट केला, तर हँग हाेणे बंद हाेऊ शकते. पण, फॅक्टरी रीसेट करण्याआधी बॅकअप घ्यायला विसरू नका. 

माेबाईलमध्ये काही अँप असे असतात, ज्याची आपल्याला गरज नसते, ते अँप वापरत नाही, असे अँप डिलीट करून टाकावेत.   

Click Here