'या' टिप्समुळे वाॅर्डराेब राहील नीटनेटकं

कपडे आणि कपाट यांच समीकरण कधीच जुळत नाही. कपाटामध्ये कपड्यांची उलथापालथ हाेतच राहते. पुढील टिप्स फॉलो केल्यास हा प्रश्न नक्की सुटेल

एखाद्या फंक्शनला जायचं असलं की आपल्याकडे चांगले कपडेच नाहीत, असं  कपाटाकडे पाहिल्यावर नेहमीच वाटतं.

घाईच्या वेळी हवे असलेले कपडे कपाटात नक्की कुठे ठेवले ते मिळत नाहीत, त्यामुळे गाेंधळ हाेताे. 

कपड्यांचा गाेंधळ टाळण्यासाठी आपल्या कपड्यांचे वर्गीकरण करून कपाटात जागा ठरवून घ्या. 

कपडे वेगवेगळे ठेवण्यासाठी फाेल्डर्स, ऑर्गनायझर, हॅंर्गस, पिशव्या यांचा वापर करा. 

राेजचे वापरातले कपडे हे मधल्या समाेर दिसतील अशा कप्प्यांमध्ये ठेवा. 

कपडे इस्त्री किंवा व्यवस्थित घड्या घालून कपाटात ठेवा, यामुळे कपडे पटकन दिसतील. 

फंक्शनसाठीच्या साड्या, ड्रेस सर्वात आधी वेगळे काढा. कपाटात या कपड्यांना वरच्या नाहीतर एकदम खालच्या कप्प्यात ठेवा. 

हेवी वर्कवाले ड्रेस, साड्या एका पातळ कापडात त्यात लवंग टाकून ठेवा.

Click Here