शरीरातील युरिक अॅसिड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आलं गुणकारी आहे.
आजकाल शरीरात युरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे.
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे अनेकांना ही समस्या होते.
ज्यावेळी युरिक अॅसिड वाढतं त्यावेळी सांधे आणि जॉईंट्समध्ये सूज येणे, वेदना होणे यांसारख्या समस्या होतात.
आल्यामध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-ऑक्सि़डेंटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरीरातील सूज कमी होते.
आल्याचे लहान तुकडे करुन पाण्यात उकळवा. या पाण्यात थोडं मध, लिंबाचा रस घालून हे पाणी दिवसातून २ वेळा प्या.
आलं आणि हळदीचं चाटण करा. हे चाटण दररोज घेतल्यामुळे युरिक अॅसिडचं प्रमाण कमी होतं.