पटेल ते रैना! IPL पदार्पणात सर्वोच्च स्ट्राइक रेटसह धावा करणारे फलंदाज 

इथं CSK च्या फलंदाजांचा दिसतो दबदबा!

चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या उर्विल पटेल याने ११ चेंडूत ३१ धावा करत धमाक्यात पदार्पण केले. 

तो आयपीएलमध्ये पदार्पणात सर्वात जलद स्ट्राइक रेटनं धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. 

इथं नजर टाकुयात IPL पदार्पणात सर्वाधिक स्ट्राइक रेटनं धावा करणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर

इंग्लंडच्या  लुक राइट याने २०१३ च्या हंगामात  पुणे वॉरियर्स इंडियाकडून पदार्पण करताना पंजाब विरुद्ध १० चेंडूत ३४० च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटलेल्या. 

२०२५ च्या हंगामात उर्विल पटेलनं CSK कडून पदार्पण करताना ईडन गार्डन्सच्या मैदानात KKR विरुद्ध ११ चेंडूत २८१.८२ च्या स्ट्राइक रेटनं ३१ धावा काढल्या. 

यंदाच्या हंगामात विपराज निगम याने दिल्लीकडून पदार्पण करताना लखनौ विरुद्ध विशाखापट्टणमच्या मैदानात १५ चेंडूत २६० च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. 

२०२४ च्या हंगामात CSK कडून पदार्पण करताना रचिन रविंद्र याने चेपॉकच्या मैदानात आरसीबीविरुद्ध १५ चेंडूत २४६.६७ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या. 

IPL च्या पहिल्या हंगामात रैनानं CSK कडून पदार्पणाच्या सामन्यात पंजाब विरुद्ध  १३ चेंडूत २४६.१५ च्या स्ट्राइक रेटनं ३२ धावा काढल्या होत्या. 

Click Here