बाळाला जन्म दिल्यानंतर किंवा वयाच्या ४५ वर्षानंतर अनेक स्त्रियांमध्ये ही समस्या दिसून येते.
अनेक स्त्रियांना युरीन लिकेजची समस्या असते. त्यामुळे कुठेही बाहेर गेल्यानंतर त्यांच्यासाठी ही समस्या डोकेदुखीची ठरते.
साधं खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतरही युरीन लिकेजचा त्रास होतो. त्यामुळे या समस्येवर काही घरगुती सोपे उपाय पाहुयात.
न्युट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन युरीन लिकेजच्या समस्येवर काही प्रभावी उपाय सांगितले आहेत.
ज्यांनी युरीन लिकेजची समस्या आहे त्यांनी सकाळी भिजवलेले खजूर खावेत. यामुळे या समस्येत आराम मिळू शकतो.
दररोज नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे. यात खासकरुन योगासनांचा आधार घ्यावा.
ज्यांना युरीन लिकेजचा त्रास आहे त्यांनी चहा आणि कॉफीचं सेवन टाळावं.