फक्त १० सेकंदात होणार UPI पेमेंट! ५ मोठे बदल

आता UPI व्यवहार आणखी जलद होणार! NPCI ने महत्त्वाचे बदल केले आहेत.

UPI पेमेंटसाठी पैसे मिळवणाऱ्याची पडताळणी आता फक्त १० सेकंदात पूर्ण होईल. (पूर्वी १५ सेकंद लागत होते).

पैसे हस्तांतरण, स्टेटस चेकसह सर्व व्यवहार आता १० ते १५ सेकंदात पूर्ण होतील. (आधी ३० सेकंद लागत होते).

हे नवीन नियम सोमवारपासून (१६ जून, २०२५) लागू झाले आहेत.

आता UPI खात्यातील शिल्लक तपासण्यावर मर्यादा येईल, दिवसाला फक्त ५० वेळा तपासता येणार.

हे बदल UPI प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आहेत.

मे महिन्यात UPI व्यवहारांची संख्या ३३% वाढली (१,८६८ कोटी व्यवहार).

सुरक्षिततेसाठी, आता फक्त अंतिम लाभार्थीचे नाव दाखवले जाईल.

UPI ॲप्सना व्यवहाराच्या उद्देशाने 'लाभार्थी नाव' बदलण्याची सुविधा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Click Here