UPI द्वारे मिळेल कर्ज; पाहा प्रोसेस

UPI Loan: आता UPI द्वारे फक्त पेमेंटच केले जाणार नाही, तर कर्जही मिळवता येईल.

भारताच्या डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये आणखी एक मोठा बदल होणार आहे. आता UPI चा वापर केवळ पेमेंट करण्यासाठीच नाही, तर कर्ज घेण्यासाठी करता येईल.

NPCI ने एक नवीन गाइडलाईन जारी केली आहेत, ज्या अंतर्गत बँका त्यांच्या ग्राहकांना PhonePe, Paytm आणि Google Pay सारख्या UPI अॅप्सद्वारे कर्ज देतील. 

NPCI ने कर्जाची ही नवीन सुविधा 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

आतापर्यंत UPI फक्त RuPay क्रेडिट कार्ड आणि काही पूर्व-मंजूर कर्जांसाठी वापरता येत होते. परंतु आता UPI द्वारे अनेक प्रकारची कर्जे मिळतील

FD वर कर्ज ,सोन्यावर कर्ज , जमीन किंवा घरावर कर्ज, शेअर्स आणि बाँडवर आधारित कर्ज, वैयक्तिक आणि व्यवसाय कर्ज, किसान क्रेडिट कार्ड वरून घेतलेले कर्ज

यूपीआय अ‍ॅपवर लॉगिन करा. क्रेडिट लाइन लिंक क्लिक करा. बँक किंवा कर्ज प्रदात्याच्या परवानगीने तुमचे कर्ज खाते यूपीआयशी लिंक करा. पेमेंट किंवा ट्रान्सफर करा.

आता तुम्ही या क्रेडिटमधून दररोज १०,००० रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू शकता. तुम्ही लहान दुकानांमध्येही खरेदी करू शकता. 

काम कॅशलेस आणि पेपरलेस असेल. नेट बँकिंग किंवा दीर्घ प्रक्रियेची आवश्यकता राहणार नाही. व्यवसायात मदत होईल. यूपीआयद्वारे थेट पुरवठादार किंवा विक्रेत्याला पेमेंट करता येते.

Click Here