लॉन्च होणार ४ कॉम्पॅक्ट SUV, पाहा फिचर्स

भारतात SUV ची मागणी झपाट्याने वाढत आहे. 

रेनॉल्ट, ह्युंदाई, महिंद्रा आणि टाटा सारख्या कार कंपन्या लवकरच भारतात त्यांच्या नवीन कॉम्पॅक्ट SUV लॉन्च करणार आहेत. 

तुम्ही येत्या काळात नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. 

रेनॉल्ट किगर फेसलिफ्ट- ही बजेट फ्रेंडली एसयूव्ही मानली जाते. आता याचे फेसलिफ्ट मॉडेल येत आहे. नवीन मॉडेलमध्ये प्रीमियम डिझाइन आणि इंटीरियर अपग्रेड मिळतील.

ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट- ह्युंदाई व्हेन्यू आता फेसलिफ्ट अवतारात लॉन्च केली जात आहे. नवीन व्हेन्यूच्या ग्रिल, हेडलॅम्प आणि बंपर डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. 

महिंद्रा XUV 3XO EV- लवकरच महिंद्रा XUV 3XO EV लॉन्च करणार आहे. हे मॉडेल टाटा पंच EV शी स्पर्धा करेल. एका चार्जवर ४०० किमी ड्रायव्हिंग रेंज देईल.

टाटा पंच फेसलिफ्ट- टाटा पंच फेसलिफ्ट रुपात येणार आहे. या अपडेटेड मॉडेलमध्ये ग्राहकांना नवीन डिझाइन आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम इंटीरियर लेआउट पाहायला मिळेल. 

Click Here