पोलंडमधील ग्रिफिनो शहराजवळ क्रिझीवी लास म्हणजेच 'क्रूक्ड फॉरेस्ट' हे अनोखं जंगल आहे. येथील ४०० झाडं गूढरित्या J-आकारात वाकलेली आहेत, जे अजूनही कोडं आहे.
ही झाडं J-आकारात वाकून मग वर सरळ वाढलेली असून, सर्वांची वाकण्याची दिशा उत्तरेकडे आहे. ती झाडे एकसंध पद्धतीने आणि समान अंतरावर लावलेली दिसतात, ज्यामुळे त्यांचं स्वरूप अधिक गूढ वाटतं.
एका सिद्धांतानुसार झाडांची वाढ होत असताना जोरदार बर्फवृष्टीखाली झुकली असावीत किंवा खोडांचा आकार त्या क्षेत्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे बदलला असावा, अशीही मान्यता आहे.
१९२५-२८ दरम्यान वनपालांनी फर्निचरसाठी झाडांना जाणीवपूर्वक वाकवले असल्याचा एक सिद्धांत आहे.
तर काहींची अशी मान्यता आहे की, दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहतवाद्यांनी हा परिसर सोडून दिल्यामुळे ही झाडे बेवारस सोडली गेली आणि त्यांचा अनोखा आकार कायम राहिला.
क्रुक्ड फॉरेस्टमधील सर्व झाडे सारख्या पद्धतीने वाकलेली असून त्यांचा आकार आणि उंचीही जवळपास समान आहे. पण ही झाडं अशी का वाकली याचं नेमकं उत्तर आजतागायत कुणालाही मिळालेलं नाही.