'फ्री' विमान प्रवास काेण करू शकतं?

किती वर्षांपर्यंत मुंल विमानातून फ्री प्रवास करू शकतात? हे माहिती आहे का? नक्की कुठे आणि कसा हाेऊ शकताे फ्री प्रवास? 

लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांसाठीच विमान प्रवास हा साेपा, सुखकर आणि आरामदायी असताे. 

विमान प्रवास हा महाग असताे. बस, ट्रेनच्या तिकींटापेक्षा विमानाची तिकीट किती तरी पटीने महाग असतात. 

ट्रेनने प्रवास करताना बर्थ, सीट घेतली नाही, तर पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे तिकीट काढावे लागत नाही. 

विमान प्रवासाच्या नियमानुसार, २ वर्षांपर्यंतच्या मुलांचे विमान प्रवासाचे तिकीट काढावे लागत नाही. 

पण, काही एअर लाईन्स कंपनीच्या नियमांनुसार, २ वर्षांच्या खालील मुलांचे ही तिकीट तुम्हाला काढावे लागू शकते. 

मुलांसाठी तिकीटाची रक्कम १२०० ते २००० रुपये इतकी असू शकते. विमान कंपन्यांच्या नियमांनुसार ही रक्कम बदलू शकते. 

मुलांबराेबर विमान प्रवास करताना, मुलांचे आयडी प्रूफ तुमच्या बराेबर घ्यायला कधीच विसरू नका. 

Click Here