बाळाला दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या हातापायांना काळा दोरा तर कमरेला करगोटा बांधतात, पण मोठ्यांनीही तो बांधावा का? वाचा!
कुंडली दोषावर उपाय म्हणून ज्योतिष शास्त्रात अनेक प्रकारचे तोडगे सांगितले जातात. पायात काळा धागा बांधणे हा देखील एक तोडगा आहे.
मात्र सर्वांनीच तो बांधला तर लाभ होतो असे नाही तर, ज्यांच्या पत्रिकेत राहू केतूचा दोष आहे, त्यांनाच तो उपाय सांगितला जातो.
हा धागा स्तोत्रमंत्रांचे उच्चारण करून प्रभावित केला जातो. मगच तो वापरण्याचा सल्ला दिला जातो.
शनिदेव हा उग्र ग्रह मानला जातो. ज्यांच्या आयुष्यात शनीची धैय्या आणि साडेसती सुरू असते त्यांनाही काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो.
शनी देवाला आपण काळया गोष्टी अर्पण करतो. काळा धागा देखील शनी देवाच्या प्रकोपासून बचाव करण्यासाठी बांधण्याचा सल्ला दिला जातो.
ज्योतिषांच्या मते, जर पुरुषांना पायात काळा धागा बांधायचा असेल तर त्यांनी मंगळवारी उजव्या पायाला काळा धागा बांधावा.
महिलांना पायात काळा धागा बांधायचा असेल तर डाव्या पायात घालणे योग्य ठरते. त्यांनी शनिवारी हा धागा पायास बांधावा.
ही एक प्रकारे श्रद्धा आहे आणि श्रद्धा ही मानसिक दिलासा असून त्यावर सर्वस्वी विसंबून न राहता प्रयत्नांची जोड हवीच, हे ज्योतिष शास्त्रही सांगते.
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.