ब्रेडच्या पॅकमध्ये दाेन्ही बाजूला नेहमी जाड ब्रेड येतात. काहीजणांना हे ब्रेड आवडत नाहीत, पण हे ब्रेड कशासाठी असतात? हे माहिती आहे का तुम्हाला?
अनेक घरांमध्ये दाेन्ही जाड ब्रेडना डिमांड नसते. त्या ब्रेडचा काय उपयाेग असा विचार हाेताे. पण, प्रत्येक पॅकमध्ये ते असायलाच हवेत. कारण...
ब्रेडच्या कडा जाड आणि मधला भाग हा मऊ असताे. जेव्हा ब्रेडच पॅकिंग केलं जातं, जाड ब्रेड हे मऊ ब्रेडला सुरक्षित ठेवतात.
ब्रेडचा पॅक उघडताना मऊ ब्रेड वरच्या बाजूला असेल तर ताे तुटू शकताे. हे टाळण्यासाठी जाड स्लाईस वर आणि खाली ठेवण्यात येताे.
दाेन्ही बाजूला जाड स्लाईस ठेवल्यामुळे ब्रेडचा थर घट्ट बसताे. हलत नाही, पॅकिंग नीट करता येते.
ब्रेडच्या मशिनमध्ये पहिला आणि शेवटा ब्रेड कट करताना घनता जास्त ठेवली जाते. यामुळे हे ब्रेड स्लाईस जाड हाेतात.
जाड ब्रेड खायचा नसेल तर त्याचा जाड भाग कापून काढला, तर मऊ, पातळ स्लाईस तुम्ही वापरू शकता.
ब्रेड पुडिंगचा बेस, ब्रेड क्रम्स करण्यासाठी हे जाड स्लाइस उत्तम पर्याय आहे. याचे एक वेगळे टेक्स्चर आणि चव येते.
जाड स्लाईसला एक वेगळी आणि चांगली चव असते, जीझ टाेस्टची चव या जाड ब्रेड्समुळे वाढते.