टीव्ही अभिनेत्री हिना खान नुकतंच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. हिनाने बॉयफ्रेंड रॉकीसोबत कोर्ट मॅरेज केलं.
लग्नासाठी हिनाने खास लूक केला होता. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाइन केलेली साडी तिने परिधान केली होती.
लग्नातील खास लूकचे फोटो हिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हिनाने हातावर रॉकीच्या नावाची मेहेंदी काढली. अगदी सिंपल पण सुंदर मेहेंदी हिनाच्या हातावर रंगली.
हिना सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. तिच्या या कठीण काळात रॉकी तिच्यासोबत खंबीरपणे उभा आहे.
गेल्या काही वर्षांपासून रॉकी आणि हिना एकमेकांना डेट करत होते.
आता त्यांनी लग्न करत कायम एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.