चांदीच्या दागिण्यांचा काळपटपणा होईल मिनिटांत गायब; फॉलो करा या टिप्स
चांदीचे दागिने वा वस्तू बऱ्याचदा काळे पडतात
सणवार आला की घरातील सोन्या-चांदीची भांडी, दागिने कपाटातून बरोबर बाहेर निघतात.
चांदीचे दागिने वा वस्तू बऱ्याचदा काळे पडतात. कितीही प्रयत्न केला तरी त्याचा काळपटपणा काही कमी होत नाही. म्हणूनच, हा काळटपणा दूर करण्याच्या स्मार्ट टिप्स पाहुयात.
एका भांड्यात अॅल्युमिनिअम फॉइल पसरवून त्याच्यावर चांदीची भांडी ठेवा. या भांड्यावर बेकिंग सोडा आणि मीठ टाका. गरमपाणी टाकून १० मिनिटे तसंच ठेवा.
ज्या दागिण्यांना पॉलिश केली असते ती भांडी दही लावून हलक्या हाताने घासावीत.
चांदीच्या भांड्यावर हलके काळे डाग असतील तर टूथपेस्टच्या सहाय्याने हे डाग काढता येऊ शकतात.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचं मिश्रण करुन त्यात चांदीची भांडी २-३ तास भिजवत ठेवा. दागिने आपोआप स्वच्छ होतील.