ऑफिसमध्ये होणाऱ्या दिवाळी पार्टीसाठी योग्य साडीची निवड केल्यास तुमचा लूक आकर्षक आणि एलिगंट दिसतो.
फार जड किंवा ग्लिटरी साड्या ऑफिस लूकसाठी ओव्हर दिसू शकतात, उलट साध्या पण ग्रेसफुल साड्या परफेक्ट फेस्टिव लूक देतात.
ऑफिसमधील दिवाळी पार्टीसाठी एलिगंट, कम्फर्टेबल आणि प्रोफेशनल लूक देणाऱ्या साड्यांची योग्य निवड करा.
कॉटन सिल्क साडी लाइटवेट आणि स्टायलिश दिसते, दिवसभर व्यवस्थित कॅरी करता येते. गोल्ड ज्वेलरीसोबत क्लासी दिसते.
ऑफिसमध्ये सिंपल पण सॉफिस्टिकेटेड लूक हवा असल्यास पीच, मिंट ग्रीन, लॅव्हेंडर अशा पेस्टल कलरमध्ये लिनन किंवा ऑर्गेन्झा साडी नक्की ट्राय करा.
ऑफिस पार्टीसाठी लहान झरी वर्क असलेली मिनिमल बनारसी साडी देखील तुम्हाला परफेक्ट फेस्टिव्ह लूक देऊन जाईल.
डिजिटल प्रिंट किंवा फ्लोरल प्रिंटच्या साड्या मॉडर्न आणि यूथफुल टच देतात. हलकीशी ज्वेलरी आणि स्लीक बन हेअरस्टाईलसोबत परफेक्ट मॅच होतात.
ऑफिस पार्टीमध्ये प्रोफेशनल लूकसाठी हँडलूम किंवा खादी साडी उत्तम पर्याय आहे.
प्लेन किंवा लहान बॉर्डर असलेली शिफॉन - जॉर्जेट साडी देखील ऑफिस पार्टीसाठी अगदी शोभून दिसेल.