अधिक झाडे लावणे म्हणजे अधिक ऑक्सिजन, निरोगी वातावरण अन् सुरक्षित भविष्य
पिंपळ- पिंपळाचे झाड दिवस-रात्र ऑक्सिजन उत्सर्जित करते. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त मानले जाते.
वड- वडाचे झाड मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन देणारे प्रभावी झाड आहे.
कडुलिंब- कडुलिंब फक्त ऑक्सिजनच नाही, तर हवा शुद्ध करण्याचे कामही करते. याला औषधी महत्त्वही आहे.
तुळस- तुळस 20 तास ऑक्सिजन देते आणि वातावरणातील विषारी वायू कमी करते.
अशोका- अशोकाचे झाड दाट पानांमुळे भरपूर ऑक्सिजन देते आणि शहरांमध्ये लावण्यासाठी उपयुक्त आहे.
अर्जुन- अर्जुनाचे झाडदेखील दिवसभरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देऊन वातावरण थंड ठेवते.
आंबा- आंब्याचे झाडदेखील मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइडही शोषून ऑक्सिजन देते.
सिल्वर ओक- शहरी भागात लावण्यासाठी योग्य, हे झाड जलद वाढते आणि भरपूर ऑक्सिजन देते.
स्नेक प्लांट आणि मनी प्लांट- हे दोन्ही झाड/वेल घरात लावण्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्रीही ऑक्सिजन सोडणारे झाड म्हणून ओळखले जाते.