जोडीने करा 'या' हिल स्टेशन्सची सफर!

आपल्या जोडीदारासोबत भारतातील 'या' सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या!

ऊटी हे तामिळनाडूतील एक सुंदर शहर आहे. हे हिल स्टेशन ब्रिटिशांनी वसवलेले होते. येथील चहाचे बागा आणि पर्वत पाहण्यासारखे आहेत.

ऊटीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान असतो. तुम्ही येथे ट्रेन किंवा विमानाने पोहोचू शकता. त्यासाठी जास्त खर्च येणार नाही.

जर तुम्ही अजून पर्वतांची राणी असलेल्या मसुरीला भेट दिली नसेल, तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नक्की जाऊन या.

मसूरी हे ब्रिटिश वास्तुकला, धबधबे आणि नद्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील केम्प्टी धबधबा पहायला विसरू नका.

बऱ्याचदा जोडपी हनिमूनसाठी शिमला निवडतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शिमलाला भेट दिलीच पाहिजे. 

शिमला १८१९ मध्ये ब्रिटीश राजवटीने वसवले होते. उन्हाळ्यातही येथील हवामान आल्हाददायक असते.

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक सुंदर शहर आहे. हा एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट देखील आहे.

महाबळेश्वरमध्ये तुम्हाला डोंगरांवरून उडणारे ढग आणि स्ट्रॉबेरीचे शेत बघता येईल.

जोडीदारासोबत पश्चिम बंगालमधील सुंदर शहर दार्जिलिंगलाही नक्की भेट द्या. दार्जिलिंगमध्ये सुंदर चहाच्या बागा तुम्हाला पाहायला मिळतील.

दार्जिलिंग हे त्याच्या टॉय ट्रेनसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही टॉय ट्रेनने अनेक ठिकाणी भेट देऊ शकता.

Click Here