बऱ्याचदा आपण कुठे फिरायचा प्लॅन केला की ऐनवेळी पिरिअड्स येतात आणि मग सगळाच गोंधळ उडतो.
पिरिअड्समध्ये प्रवास करतांना अनेकदा अडचणी येतात. म्हणूनच, हा प्रवास सुखकर होण्यासाठी काही टिप्स पाहुयात.
कोणत्याही प्रवासाला जाण्यापूर्वी तुमची तारीख असो वा नसो पिरिअड्ससाठी लागणारं सामान कायम सोबत ठेवा.
पॅड, डिस्पोजेबल बॅग, वेट वाइप्स, हँड सॅनिटायझर सोबत ठेवा.
पिरिअड्सच्या काळात कायम हायवेस्ट जीन्स, फ्लोई ड्रेस किंवा लांब टॉप, कुर्ता युज करा. तसंच गडद रंगाचे कपडे घालण्यावर भर द्या.
अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात कंबरदुखी, पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे पोर्टेबल हॉटिंग पॅच, हर्बल टी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे सोबत ठेवा.
कुठेही फिरायला जाण्यापूर्वी योग्य प्लॅन करा. जिथे सहज प्रसाधनगृहाची सोय असेल अशी ठिकाणं पहिले निवडावित.