प्रवासात बाहेरचं खाणं नकोय? मग घेऊन जा झटपट होणारे घरगुती पदार्थ
लांबच्या प्रवासात घेऊन जा झटपट होणारे हे घरगुती पदार्थ
अनेकदा लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर सतत बाहेरचे पदार्थ खाणं नकोसं वाटतं. त्यामुळेच असेच काही पदार्थ पाहुयात जे घरी करता येतील आणि बराच काळ टिकतीलही.
तुम्ही लहान मुलांना घेऊन प्रवास करत असाल तर सुका खाऊ नक्कीच सोबत ठेवा. जसं की, चिवडा, खाकरा, बिस्किट, चकली. छोट्या भुकेसाठी हा बेस्ट पर्याय आहे.
दुधात भिजवलेल्या पुऱ्या किंवा पराठे
प्रवासात पोळीसोबत खाण्यासाठीचा बेस्ट पर्याय म्हणजे चटणी. तुम्ही कोणत्याही प्रकारची चटणी सोबत नेऊ शकता.