रेल्वे हाॅर्नचा आवाज किती मोठा असताे?

रेल्वेने प्रवास करताना, प्लॅटफाॅर्मवर उभे असताना किंवा रेल्वे स्टेशनजवळून जाताना, रेल्वे हाॅर्नचा आवाज ऐकला आहे का?

रेल्वेच्या हाॅर्नचा आवाज ऐकल्यावर एकदम दचकायला हाेते. पण, या हाॅर्नचा आवाज किती माेठा असताे, हे माहिती आहे का?

रेल्वे हाॅर्नचा आवाज हा ११० ते १४० डेसिबल इतका माेठा असताे. हा आवाज खूप माेठा असल्याने आपल्याला सावध करताे. 

काेणत्याही प्रकारचा माेठा आवाज ऐकल्यावर नैसर्गिकरित्या मेंदू आपल्याला सावधानतेचा इशारा देताे. हेच हाॅर्नचे मुख्य काम आहे. 

रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वेकडे असलेल्या सुरक्षा साधनांपैकी हाॅर्न हे एक महत्त्वाचे साधन आहे. 

रेल्वे हाॅर्नचा आवाज खूप माेठा असल्याने ३ ते ५ किलाेमीटर अंतरापर्यंत स्पष्टपणे ऐकू येताे. 

रेल्वे रूळावर अथवा प्लॅटफाॅर्मच्या कडेला असलेल्या माणसांना, पक्षी, प्राण्यांना सावध करण्यासाठी या हाॅर्नचा प्रामुख्याने वापर हाेताे. 

हवामान, पाऊस, धुके याचा परिणाम हाॅर्नच्या आवाजावर हाेताे. त्यामुळे ताे किती लांबपर्यंत पाेहचेल हे या गाेष्टींवरही अवलंबून असते. 

Click Here