रेल्वेचे इंजिन किती सीसीचे असते..., सिलिंडरच एवढे असतात की...

तुम्ही म्हणाल आता ईलेक्ट्रीक इंजिन आलीत, मग त्यांची शक्ती किती असते...

तुम्ही वाहन घेताना त्याचे इंजिन किती सीसीचे आहे हे तपासता का.... हो.

त्यावरच तुमच्या कार, बाईकचे मायलेज, पिकअप ठरते. तुम्हाला ती योग्य आहे का हे देखील ठरते.

इंजिनाची ताकद मोजण्यासाठी सीसीचा वापर करतात. ट्रेनचे इंजिन किती सीसींचे असते?

ट्रेनच्या इंजिनाला मोठमोठे, अवजड डबे ओढायचे असतात. प्रवासी ट्रेनला एकच इंजिन असते. परंतू, मालगाडीला दोन इंजिन जोडली जातात. 

डिझेल लोकोमोटिव्ह इंजिनमध्ये १६ सिलिंडर असतात. कारमध्ये थ्री, फोर सिलिंडर ऐकले असेल तसेच.

परंतू ट्रेनचे सिलिंडर एवढे मोठे असतात की यामध्ये एकावेळी १५० लीटर डिझेल असते. 

ट्रेनची इंधन टाकीची क्षमता ५० हजार लिटरपर्यंत असते. 

प्रत्येक सिलिंडर १०,९४१ सीसी एवढा शक्तीशाली असतो. १६ सिलिंडरची ताकद १,७५,००० सीसी एवढी प्रचंड होते. 

हे इंजिन एवढे महाग असते की त्याची किंमत १८ कोटींपेक्षा जास्त असते. 

आता भारतात ट्रेन ओढण्यासाठी ईलेक्ट्रीक इंजिनला सुरुवात झाली आहे. या इंजिनची शक्ती 12,000 hp एवढी प्रचंड आहे.