भारतात कोणत्या कंपनीच्या ई-बाइकची सर्वाधिक झाली विक्री?

ई-बाइक बाजारात सर्वाधिक हिस्सा कुणाचा?

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. शहरांमध्ये ई-बाइकचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील आकडेवारीनुसार एकूण ११.५ लाख ई-बाइक विकल्या गेल्या. ई-बाइकच्या विक्रीमध्ये ओला इलेक्ट्रिकने निर्विवाद आघाडी घेतली आहे.

एकट्या ओला इलेक्ट्रिक बाइकचा वाटा ३० टक्के इतका आहे. यानंतर टीव्हीएस व बजाज यांचा हिस्सा अनुक्रमे २१ आणि व २० टक्के इतका आहे. 

भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगात अथर, हीरो, ग्रीव्स आणि इतर कंपन्यांचाही लक्षणीय सहभाग राहिला. या कंपन्यांच्या गाड्यांचीही खरेदी बरीच आहे.

भारतात आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये अथरच्या ११ टक्के ई बाइक विकल्या गेल्या. त्यानंतर हिरोच्या ४ टक्के, तर ग्रीव्ह्स कंपनीच्या ४ टक्के इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या. 

भारतीय इलेक्ट्रिक बाइक विक्रीमध्ये इतर कंपन्याचा वाटाही मोठा आहे. लोकांनी खरेदी केलेल्या ई बाईक्समध्ये इतर कंपन्यांच्या १० टक्के बाइकची विक्री झाली आहे.

Click Here