भारतात खासगी कॉलेजमधून MBBS करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतो.
परदेशात MBBS करण्यासाठी रशिया हा सर्वात स्वस्त देश आहे. येथे एका वर्षाची फी २.५ ते ५ लाख रुपये आहे. रशियामध्ये अनेक टॉप मेडिकल युनिव्हर्सिटी आहेत.
किर्गिस्तान हा MBBS साठी स्वस्त देश मानला जातो. येथील प्रवेश प्रक्रिया खूप सोपी आहे. वार्षिक फी २.३ लाख ते ४ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
मध्य आशियात स्थित कझाकस्तान हे भारतीयांमध्ये MBBS साठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथील एमबीबीएससाठी वार्षिक फी ३ लाख ते ५ लाख रुपये आहे.
MBBS साठी चीन हा जगातील सर्वोत्तम देशांपैकी एक मानला जातो. येथे तुम्ही वर्षाला ३ लाख ते ७ लाख रुपये खर्च करून डॉक्टर बनू शकता.
मध्य आशियाई देश उझबेकिस्तान परवडणाऱ्या शिक्षणासाठी ओळखला जातो. येथे तुम्ही दरवर्षी २.४ लाख ते ४ लाख रुपयांमध्ये डॉक्टर बनू शकता.
फिलीपिन्समधील वैद्यकीय शिक्षण अमेरिकेच्या धर्तीवर आहे. त्यामुळे येथील MBBS चे शुल्क वार्षिक ३.५ लाख ते ६ लाख रुपयांपर्यंत आहे.
युरोपियन देश पोलंड देखील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लोकप्रिय ठिकाण म्हणून उदयास येत आहे. येथे तुम्ही ५ लाख ते १० लाख रुपयांच्या वार्षिक शुल्कात डॉक्टर बनू शकता.
जर्मनी हा देखील वैद्यकीय शिक्षणासाठी अव्वल देश आहे. येथील विद्यापीठांमध्ये खूप कमी किंवा कोणतेही शिक्षण शुल्क आकारले जात नाही. मात्र, खाजगी विद्यापीठांमध्ये शुल्क भरावे लागेल.