'हे' 5 पदार्थ खा अन् वाढवा शरीरातील कॅल्शिअम

या 5 पदार्थांनी भरुन निघेल शरीरातील कॅल्शिअमची कमतरता

हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम अत्यंत गरजेचं आहे.

कॅल्शिअम वाढवणारे असे अनेक पदार्थ आहेत ज्यांच्यातून शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शिअम मिळतं. हे पदार्थ कोणते ते पाहुयात.

कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत म्हणजे ब्रोकोली. यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शिअमचं पुरेपूर प्रमाण असतं.  एक कप ब्रोकोलीमध्ये साधारणपणे ४५ मिलीग्राम कॅल्शिअम असतं.

पावटा सगळ्यांनाच ठावूक आहे. हे पावटे सुद्धा कॅल्शिअमचा मोठा स्त्रोत मानला जातो. यामध्ये प्रथिने, फायबर आणि आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. 

पनीरला दुसरा पर्याय म्हणून टोफूकडे पाहिलं जातं. टोफूमध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणावर असतं. विशेष म्हणजे माशांपेक्षा जास्त कॅल्शिअम टोफूमध्ये असल्याचं म्हटलं जातं.

१०० ग्रॅम चिया सिड्समध्ये ६३ मिलीग्राम कॅल्शिअम असतं. सोबतच त्याच्यात ओमेगा -3 फॅटी ऍसिड, प्रोटीन यांचही प्रमाण पुरेपूर असतं.

अनेकांच्या आवडीची भाजी म्हणजे भेंडी. या भाजीमध्ये कॅल्शिअमसोबतच मॅग्नेशिअमदेखील असतं. ज्यामुळे हाडांना चांगली मजबुती मिळते.

लसणाच्या लेपामुळे दूर होतील पिंपल्स

Click Here