आजचे राशीभविष्य २४ मे २०२५, कसा असेल पावसाळी विकेंड...
दुपार नंतर कामाचा प्रारंभ सहजपणे होईल. कौटुंबिक वातावरणात सुधारणा होईल. धार्मिक कार्ये घडतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आप्तांवर खर्च होईल. त्यांच्याशी मतभेद सुद्धा होतील. धार्मिक कार्यांवर खर्च होईल. स्वभाव उदासीन होईल.
व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील व वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. दुपार नंतर मित्रांकडून लाभ होईल.
आज वरिष्ठांशी वाद होण्याच्या शक्यतेमुळे उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक चिंता राहील.
आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता आहे. मानसिक व्यग्रता राहील. कुटुंबियांशी भांडणे होतील.
करमणुकीमुळे दिवस आनंदात जाईल. व्यापारी येणी वसूल होतील. दुपार नंतर प्रकृती नरम गरम होईल. अचानक लाभ संभवतात.
कार्यनैपुण्य आणि कलेची जाण प्रदर्शीत करण्याची संधी मिळेल. मनोरंजक वातावरणात आपण आनंदात असाल व आप्तेष्टांना त्यात सहभागी करून घ्याल.
प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. तरीही प्रत्येक कार्य शांतपणे करावे लागेल. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
आर्थीक नुकसान व मानहानी संभवते. दुपार नंतर मात्र मन विधायक कार्याकडे वळेल. प्रेमभावना वाढीस लागेल.
दुपार नंतर एखाद्या दुर्घटनेमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. व्यावसायिकांना व्यावसायिक चिंता भेडसावतील.
दुपार नंतर विचारात स्थैर्य येईल. सृजनशील व कलात्मक गोष्टींकडे आपला कल राहील. घरातील वातावरण सुख- समाधानाचे राहील.
दुपार नंतर मात्र मनावर संयम ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. पैशाच्या देवाण- घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल.