फायद्यात नुकसान होणार नाही, याकडे लक्ष द्या...

आजचे राशीभविष्य, कोणाच्या राशीत काय...

अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. दूर राहणार्‍या संतती कडून आनंददायी बातम्या मिळतील. प्रवास - पर्यटनाचे बेत यशस्वीपणे आखाल.

नवीन कार्याचे आयोजन हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्य जीवनात गोडी राहील. प्रकृती उत्तम राहील. धन व मान- सन्मान प्राप्त होतील.

पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत. संततीची काळजी राहील.

सरकारी कामात विघ्ने येतील. कुटुंबात भांडणे होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वास्थ्य राहील.

शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद ह्यापासून दूर राहावे. कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार नाही.

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. कामात सांभाळूनच पुढे चला. आहाराकडे लक्ष द्या. अजीर्णाचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन ह्यात गोडी निर्माण होईल.

धन व किर्तीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. मन प्रसन्न नसल्याने आज झोप सुद्धा होणार नाही.

मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. आज आपल्या जीवनात आनंद ओसंडून वाहू लागेल. मित्र व स्नेही भेटल्यामुळे आनंदित व्हाल.

आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकाल. गृहिणी आज असंतुष्ट राहतील. शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

प्रवास, सहल ह्यातून सुद्धा आज आनंद मिळवू शकता. आज विचारातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा.

मिळणार्‍या फायदयात नुकसान होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे निर्णय विचार पूर्वक घ्या. अपघात व गैरसमज ह्यापासून दूरच राहा.

Click Here