धनलाभ होईल, नोकरीत बढती; दुपारनंतर पहा काय बदलेल...
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५, चंद्र आज वृश्चिक राशीत
दुपारनंतर प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यापार - व्यवसायात सावध राहावे लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. संततीच्या बाबतीत मात्र आपली द्विधा मनःस्थिती होईल.
दुपार नंतर वाद होण्याची शक्यता असल्याने बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल.
दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल. स्वकीय व मित्रांसह हिंडण्या - फिरण्याची व प्रेक्षणीय स्थळी जाण्याची संधी मिळेल.
कामा निमित्त अनेक लोकांशी भेट सुद्धा होईल. आपली सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा उंचावेल. कामात सुद्धा लाभ होईल.
कौटुंबिक वातावरण सुद्धा सुखद असेल. सूर्याच्या प्रभावामुळे आपणास वडिलांकडून सुद्धा लाभ होईल. कामाच्या ठिकाणी आपणास एखाद्या नवीन जवाबदारीचे काम दिले जाऊ शकते.
मानसिक व शारीरिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईची तब्बेत बिघडेल. शक्यतो आज स्थावर संपत्तीचे व्यवहार करणे टाळावे.
सूर्य गोचरीने वृषभेतून भ्रमण करत असताना आपणास सावध राहावे लागेल. ह्या दरम्यान आपणास एखादा संसर्गजन्य विकार होण्याची संभावना आहे.
दुपार नंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आपल्या बोलण्याने किंवा कृतीने कुटुंबीय दुखावतील व त्यामुळे कटुता निर्माण होईल.
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. सूर्याचे वृषभेतील भ्रमण आपल्या फायद्याचे होणारे आहे. ह्या दरम्यान शत्रू दुर्बल होतील.
कोर्ट- कचेरीची कामे जपून करावीत. सूर्याचे वृषभेतील भ्रमण आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांती लाभेल.
प्रॉपर्टीशी संबंधित कामात सावध राहावे लागेल. मातेच्या प्रकृतीमुळे सुद्धा आपण चिंतीत होऊ शकता.
सूर्याचे वृषभेतील भ्रमण आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. आपणास आर्थिक लाभ होईल. कुटुंबियांशी आपले नाते सुद्धा दृढ होईल.