आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल.

वृषभ  - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. प्रकृतीची साथ मिळणार नाही.

मिथुन  - आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. 

कर्क  - आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. 

सिंह - आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. 

कन्या - आज 'मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. 

तूळ  - आज आपले मन मित्रांसह खाणे - पिणे, फिरावयास जाणे तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी राहील.

वृश्चिक - आजचा दिवस सौख्यदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता अनुभवाल. 

धनु - आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील व त्यामुळे संताप वाढेल. 

मकर - आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावे लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल.

कुंभ  - आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल.

मीन -  आज खर्च, संताप व जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे.

Click Here