आजचे राशीभविष्य: गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवा
जाणून घ्या तुमच्या राशी काय सांगतेय?
परिश्रम करून कमी यश प्राप्त झाल्याने नैराश्य येईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. पोटाच्या तक्रारीमुळे हैराण व्हाल. प्रवासात अडथळे येतील. सरकारी कामात मात्र यश मिळेल.
वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात प्रगती करू शकतील.
आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत. मनाच्या चंचलतेमुळे विचार सतत बदलतील.
मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. प्रकृती ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होतील.
सरकारी कामात यश मिळेल. वडील व वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. उतावीळपणा सोडावा लागेल. काही कारणाने आपला संताप वाढेल.
कोर्ट-कचेरी संबंधी कामात सावध राहावे लागेल. अचानकपणे खर्च उदभवतील. संतापामुळे कामात व्यत्यय येईल. मानसिक बेचैनी जाणवेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल.
घरात पत्नी व संतती ह्यांच्या कडून काही सुखद बातमी मिळेल. धनप्राप्ती संभवते. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. एखाद्या स्त्रीमुळे फायदा होईल.
नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. तब्बेत उत्तम राहील. धनलाभ संभवतो. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. मित्र व संबंधितां कडून लाभ होतील.
मनात चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात अडचणी येतील. नशीबाची साथ मिळणार नाही. जोखमीच्या कामा पासून शक्यतो दूर राहावे. कार्य साफल्य होणे कठीण आहे.
अचानकपणे खर्च उदभवतील. भागीदारीत मतभेद संभवतात. गुडघेदुखीचा त्रास संभवतो. संताप व नकारात्मक विचारां पासून दूर राहणे हितावह राहील.
आज प्रणय प्रसंगामुळे दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री वाढेल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल. विवाहितांना वैवाहिक सुख मिळेल.
दैनिक कामे सुरळीतपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वभाव उतावळा बनेल. बोलण्यात मर्यादा व वर्तनात नम्रता ठेवावी.