राशीभविष्य - ९ जुलै २०२५; कसा असेल तुमचा आजचा दिवस...
नोकरी -व्यवसायाच्या ठिकाणी, घरात आपल्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी होऊ शकाल.
आज आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आज नियोजित वेळेत आपले काम पूर्ण होऊ शकणार नाही.
मित्र व कुटुंबीयांसह आनंदी वातावरणात दिवस घालवाल. सामाजिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल. दांपत्य जीवनाचे सौख्य उपभोगू शकाल.
कुटुंबीयांसह आनंदात वेळ जाईल. महत्त्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील.
संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. मित्रांचा सहवास आनंद देईल. हातून एखादे परोपकाराचे कार्य घडेल.
कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची प्रकृती बिघडेल. कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी. अतिरिक्त पैसा खर्च होईल.
नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. परदेशातून आनंददायी बातम्या येतील.
विचारांवर असलेला नकारात्मक पगडा दूर सारावा लागेल. एखाद्या कामासाठी खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे.
वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. आपला व्यवहार सामान्य राहील. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. सामाजिक क्षेत्रात यश व कीर्ती लाभ होईल.
आरोग्य विषयक चिंता राहील. संतती व नातेवाईक यांच्याशी मतभेद संभवतात. यश कष्टप्रदच होईल. मन व्याकूळ होईल. एखादा अपघात संभवतो.
पत्नी व संतती यांच्याकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. एखाद्या सहलीचे आयोजन करू शकाल.
एखादा मोठा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. सरकारकडून फायदा होईल.