राशीभविष्य: वाद होण्याची शक्यता, मौन पाळा

६ जुलै २०२५: तुमची राशी काय सांगतेय?

दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आपल्या कृती संयमित ठेवणे हितावह राहील. राग, द्वेष यांपासून दूर राहावे लागेल. शत्रूंचा उपद्रव वाढेल.

सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. दुपार नंतर चांगले मनोरंजन होईल.

कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील. संतती विषयक काळजी निर्माण होईल. 

काही कारणाने आपणास नैराश्य येईल. स्थावर संपत्तीचा व्यवहार न करणे हितावह होईल. दुपार नंतर शारीरिक प्रसन्नता जाणवेल. नव्या कामात अडथळे येतील.

फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपार नंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. संपत्ती विषयक व्यवहार टाळणे हितावह राहील

आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात यशस्वीपणे करू शकणार नाही. मतभेद होण्याची शक्यता असल्याने मौन पाळावे.

कुटुंबीयांशी मतभेद होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील. आपला अहंकार जपण्यापेक्षा इतरांकडे लक्ष देऊन त्यांच्याशी समझोता करणे रास्त ठरेल.

नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता. दुपार नंतर कार्यपूर्ती दृष्टिक्षेपात येईल.

प्राप्तीत वाढ संभवते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल. मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ संभवतो. अपघाताची शक्यता आहे.

आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. बढती संभवते.

आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकाल. दुपार नंतर व्यवसायातील वातावरण अनुकूल होईल. 

आज वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होईल. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतात.

Click Here