मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी व निम-सरकारी कामात यश मिळेल. दांपत्य जीवनात सुख मिळेल व सुसंवाद राहील.
नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. सरकारकडून लाभ मिळण्याची बातमी मिळेल.
नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. राजकीय अडचणी व्यत्यय आणतील. महत्वाचे काम किंवा निर्णय आज स्थगित ठेवणे हिताचे राहील.
रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल. नवे संबंध त्रासदायक ठरतील. आर्थिक चणचण भासेल. एखादी दुर्घटना किंवा शस्त्रक्रिया संभवते.
आज पती-पत्नीत किरकोळ कारणांनी मतभेद होतील. सार्वजनिक जीवनात मानभंग होण्याची शक्यता आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास त्रासदायक ठरेल.
काही सुखद प्रसंग घडतील. प्रकृती उत्तम राहील. रुग्णांची तब्बेत सुधारेल. आर्थिक लाभ होतील तसेच यशही मिळेल. सहकारी पूर्ण सहकार्य करतील.
बौद्धिक कामे व चर्चेत दिवस घालवू शकाल. संतती कडून काही चांगली बातमी मिळेल. आपली प्रगती होईल. स्त्रियांकडून सहकार्य मिळेल.
शक्यतो आज शांत राहावे. संबंधीतांशी मतभेद होतील. यशहानी किंवा धनहानी होऊ शकते. एखाद्या स्त्रीमुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
भावंडांशी चांगले संबंध राहतील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी अनुकूलता लाभेल. कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी ह्यात गुंतवणूक करू शकाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळे बिघडू शकते.
शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल.
एखाद्या मांगलिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. लहानशा फायद्यासाठी मोठे नुकसान होणार नाही ह्याचा विचार करावा.