आज जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल.
आज शरीराने व मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल.
आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल.
आज आपणास शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. मित्र व स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल.
आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद-विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावधपणे पाऊले टाका.
आज विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक होतील. वैवाहिक सुखाचा मनसोक्त आनंद मिळवाल.
आज आपली कामे सहजतेने पूर्ण होतील. मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल.
आज आळस, थकवा व चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीची आपणास चिंता वाटेल.
आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील.
आजचा दिवस कामाचा व्याप व मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल.
आज आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. नोकरी - व्यवसायात सहकारी सहकार्य करतील.
आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील.