आजचे राशीभविष्य : गुरुवार २६ मार्च २०२६; आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस लाभदायी
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ सुद्धा कराल. शीघ्र गतीने विचारात बदल होऊन मनाची अवस्था द्विधा होईल.
आपली अनिर्णायकी अवस्था झाल्याने हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल. मनात वैचारिक गोंधळ उडाल्याने आज आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही.
आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन व स्वस्थ चित्ताने होईल. मित्र व नातलगांसह सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस लाभदायी आहे.
आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संबंधितांचे गैरसमज झाल्याने आपण व्यथित व्हाल. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल.
आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी जाण्याची शक्यता आहे. मनात विचारांचे काहूर माजेल. द्विधा मनःस्थितीमुळे नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नती संभवते.
आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायात मोठा फायदा संभवतो. परदेशस्थ मित्रां कडून एखादी आनंददायी बातमी मिळेल.
आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्या पासून दूर राहणे हितावह राहील.
आजचा दिवस आनंददायी व समाधान मिळवून देणारा आहे. मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल.
आजचा दिवस व्यापार - व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल.
आजचा दिवस मानसिक अशांतता व उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही.
आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
Chanakya Niti : कधीकधी मूर्ख बनण्याचे नाटक करणेही आवश्यक...!