आजचे राशीभविष्य, ३ जुलै २०२५; तुमची राशी काय सांगतेय?
आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. शारीरिक व मानसिक उत्साहाचा अनुभव होईल. मित्र - स्वकीयां कडून भेटवस्तू मिळतील.
शुभ कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन - लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. पोटाच्या तक्रारीने त्रस्त व्हाल.
महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आई व स्त्रीयांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. शक्यतो प्रवास टाळा. पाणी व द्रव पदार्थ घातक ठरतील. जमीन, मिळकतीवर चर्चा करू नका.
मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ संभवतो.
स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल.
लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जोडीदाराचा सहवास व प्रवास ह्यात आपला दिवस आनंदात जाईल.
थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत आणेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. भिन्नलिंगी आकर्षण प्रबळ होईल.
पत्नी व संतती कडून चांगल्या बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरी - व्यवसायात संधी मिळून उत्पन्न वाढेल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल.
आजचा दिवस कार्य साफल्याचा आहे. नवे काम सुरू कराल. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील.
साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील.
निषेधात्मक व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. वाद, भांडणे ह्या पासून दूर राहा. राग व बोलण्यावर संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण कलुशित राहील. आर्थिक चणचण जाणवेल.
स्वजनांसह सहलीस जाऊ शकता. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होण्याची शक्यता आहे.