आज चंद्र 25 मे, 2025 रविवारी मेष राशीत स्थित आहे.
मित्र व सगे सोयरे ह्यांच्या भेटीने घरातील वातावरण आनंदी होईल. उत्तम कपडे व भोजन प्राप्ती होईल.
स्नेही व कुटुंबीय ह्यांच्याशी मतभेद झाल्याने आपण दुःखी व्हाल. आपण सुरू केलेले काम अपूर्ण राहील.
व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल.
धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती होईल. घराच्या सजावटीत फेरबदल कराल. दिवसभराच्या कामामुळे थकवा जाणवेल. प्रकृती उत्तम राहील.
आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. उतावीळपणामुळे निर्णय घेऊन किंवा वाटचाल करून नुकसान होण्याची शक्यता आहे.
महत्वाचे निर्णय किंवा जोखिम ह्यापासून वाचण्यासाठी विल, विरासत इत्यादीत अडचणी निर्माण होऊ शकतात.
भागीदारांशी लाभाच्या गोष्टी होतील. उंची वस्त्रे व अलंकार यांची खरेदी होईल. उत्तम दांपत्यसुख व वाहनसुख मिळेल.
कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्याने अनेक कामे हाता वेगळी कराल. अपूर्ण कामे तडीस जातील.
रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतती विषयक बाबींमुळे चिंता वाढतील. शक्यतो आज प्रवास टाळावेत.
सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. छातीत दुखणे संभवते. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत येऊ शकता.
लहान प्रवास होतील. मित्र व स्वजनांच्या सहवासाने आपले मन आनंदीत होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कौशल्य पूर्वक उत्तम यश मिळवाल.
उत्कृष्ट भोजन मिळेल. स्वास्थ्य ठीक राहील, तसेच मनाचे स्वास्थ्य सुद्धा आपण चांगले टिकवून ठेवाल.