राशीभविष्य : आज कार्यात यश मिळेल पण जरा विलंब लागेल...

चंद्र आज 16 मे, 2025 शुक्रवारी धनु राशीत आहे.

एखाद्या मंगल कार्याला उपस्थिती लावाल. प्रवास संभवतो. रागावर ताबा ठेवावा लागेल. संतापामुळे नोकरी - व्यवसायात किंवा घरी मतभेद होतील.

प्रवासात विघ्ने येतील. नोकरी - व्यवसायाच्या जागी कामाचा व्याप वाढल्यामुळे थकून जाल. आपणास मानसिक शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

नवे कपडे, दागीने व वाहन खरेदी करू शकाल. मन आनंदाने भरून जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण राहील. 

नोकर वर्गाकडून व मातुल घराण्याकडून लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. आवश्यक खर्च होतील.

प्रिय व्यक्तीचा सुखद सहवास लाभेल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. पाण्या पासून भीती आहे. सबब जलाशयाच्या ठिकाणी दुस्साहस करू नका. 

जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील. भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. 

विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. अनावश्यक खर्च उदभवू नयेत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. 

स्नेहीवर्ग व मित्रांच्या सहवासाने आनंद होईल. आर्थिक लाभ होईल. वैवाहिक जोडीदारा कडून सुख - समाधान मिळेल.

एखादी दुर्घटना संभवते. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. कोर्ट - कचेरी प्रकरणात सांभाळून पावले उचला. सामाजिक उपक्रमांत भाग घ्याल. 

आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. रमणीय स्थळी पर्यटनासाठी जाण्याचा बेत ठरवाल. 

वसुलीची रक्कम प्राप्त होईल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.