धन लाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील

ठरवलेली कामे होतील का?  वाचा काय सांगतेय तुमची राशी...

आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. मित्र, स्नेही व सोबती भेटल्याने घरातील वातावरण आनंदी राहील.

आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. वायफळ खर्च होईल. 

शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. समाजात मान - सन्मान प्राप्त होईल. 

एखादा प्रवास संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्न राहाल. नशिबाची साथ मिळेल. घरात भावंडांबरोबर आनंदात वेळ घालवाल. विदेश यात्रेची संधी लाभेल. नोकरदारांना लाभ होईल.

आरोग्याकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळा. आजारामुळे खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार मनावर प्रभाव पाडतील. कुटुंबातील व्यक्तींशी जपून राहा.

दांपत्य जीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी करून ते वापरण्याची संधी मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होईल. त्यांच्याशी मैत्री जुळेल. 

नोकरीत यश मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील.

आज आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. मैत्रिणी भेटतील. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील.

आज आपणात शारीरिक व मानसिक स्फूर्ती व उत्साह ह्यांचा अभाव राहील. आईची प्रकृती बिघडेल. अपमान होण्याचे प्रसंग येतील. धनहानी होईल. स्त्रीवर्गा कडून हानी संभवते.

अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. भागीदारीत फायदा होईल. विद्यार्थ्यांना यश प्राप्त होईल.

आपल्या द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. वाणीवर ताबा न राहिल्याने वाद - विवाद होऊन आपल्याच लोकांशी मतभेद होतील. कामात अल्प प्रमाणात यश मिळेल.

नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल. परोपकारी कार्यावर खर्च होईल.