आजचे भविष्य,२८ ऑक्टोबर: हाती पैसा, धनलाभ

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष: रागावर नियंत्रण ठेवा. कार्यालयात अधिकारी, विरोधक, घरात कुटुंबीयांशी वाद घालू नका. शांत राहून दिवस घालवा.

वृषभ: वेळेवर जेवण व झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता. मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावे. 

मिथुन: मौजमजा व मनोरंजनात विशेष रस घ्याल. सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल. हातून विधायक कामे होतील.

कर्क: आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा. नोकरीत लाभ होईल. सहकारी सहकार्य करतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात शक्य.

सिंह: सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल. साहित्य व कला क्षेत्रांत नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. मनाला आनंद वाटेल.

कन्या: प्रतिकूलतेस तोंड देण्यास तयार राहावे लागेल. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.

तूळ: दिवस अनुकूल आहे. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक लाभदायक. विदेशातून चांगल्या बातम्या येतील.

वृश्चिक: नकारात्मक मानसिक वृत्ती टाळावी. 'मौनं सर्वार्थ साधनम्' या नीतीने वागा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु: कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता. प्रवासाची शक्यता. समाजात यश व कीर्ती वाढेल.

मकर: मंगल कार्यांत मग्न राहाल. परोपकारी कार्यांवर पैसा खर्च होईल. खूप कष्ट व कमी यश यामुळे निराशा निर्माण होईल. 

कुंभ: आज नवे काम हाती घेऊ शकाल. लाभ होईल. प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळेल. सुख समाधान लाभेल. मन आनंदी राहील.

मीन: दिवस शुभ फलदायी. उत्साह द्विगुणित. व्यापारात व उत्पन्नात वाढ. येणी वसूल होतील. सरकारकडून लाभ होईल.

Click Here